ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सौर पॅनेल चोरट्यास अटक 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : येथून जवळच असलेल्या नकोडा मॅगझिन परिसरातून २७ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने सौर पॅनेल, करंट मशीन, बॅटरी चोरून नेली होती.

याबाबत कळताच अतुल दत्तू विधाते वन विभाग चौकीदार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तपास चक्र फिरवून आरोपी हुसैन विठ्ठल सोयाम (४१ रा. नकोडा) यास सोमवारला नकोडा येथून अटक केली.

आरोपीकडून सौर पॅनेल, करंट मशीन, बॅटरी असा एकूण १३, ६१५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सचिन तायवाडे, गुन्हे पथकाचे मनोज धकाते, विशाल हुड, रवी वाभीटकर, महेंद्र भुजाडे, नितीन मराठे, अनिल बैठा, सुधाकर वरघणे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये