
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 30.01.2025 रोजी गोपनिय बातमिदाराकडुन खबर मिळाली की, मौजा तळेगाव (टालाटुले) येथे मिलींद इंगळे याने आपल्या घरी अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने त्याची साठवनुक करून ठेवली आहे.
अशा मिळालेल्या माहिती वरूना सपोनि श्री प्रफुल डाहुले हे पोलीस स्टॉप सह शासकीय पंच, फोटोग्राफर, काटा मापक, का संपूर्ण किटसह तळेगाव (टालाटुले) येथे पोहचुन मिलींद इंगळे याचे राहते घराची पंचासमक्ष रीतसर घरझडती घेतली असता कवेलु असलेल्या रूममध्ये एका पोत्यात प्लास्टीक पन्नीमध्ये गुंडाळून 1.375 किलो ग्राम वजनाचा गांजा किमंत 15,000/- रू चा गांजाचा माल मिळुन आल्याने संपुर्ण कार्यवाही करून आरोपी नामे मिलींद इंगळे रा. तळेगाव (टालाटुले) ता.जि.वध याचे विरूध्द पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे अपराध कमांक 59/2025 कलम 8 क, 20 ब एना डी.पी.एस. अॅक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री. राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रफुल डाहुले पोलीस हवालदार रवी वर्मा, पोलीस हवालदार राहुल नव्हाते, पोलीस अंमलदार सतिश हां चालक पोलीस अंमलदार विठ्ठल केंद्रे यांनी केली.