ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिचपल्ली येथे शाळापूर्व तयारी मेळावा

चांदा ब्लास्ट

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचपल्ली येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.दोनचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम बँड पथकासह प्रभात फेरी संपूर्ण गावातून काढण्यात आली. नंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माता पालकांच्या हस्ते करण्यात आले. मिरवणूक शाळेत येताच नवागतांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करून त्यांचे सेल्फी काढण्यात आले. नंतर नाव नोंदणी करून सर्व स्टॉलवर त्यांच्या कृती करून घेण्यात आल्या. ह्या प्रसंगी प्रथम संस्थेचे सदस्य मान. रमेश आत्राम हे उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान. दीपक भाऊ रामटेके तसेच पालक वर्ग.मान.विजय वनकर केंद्रप्रमुख – मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक उपस्थित होते.सर्व नवागतांना पेढा देऊन गोड गोड शाळा अनुभव देण्यात आला.

    यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मिनल दोडके शिक्षणप्रेमी हिने तर आभार विजय वनकर सर यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये