ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून ग्रीन मॅट व भोजन पट्टी वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे सभोतालील गांवातील विकासाकरीता नेहमी नवं-नवीन उपाययोजना करीत असते.

त्याचाच एक भाग म्हणून,सभोवतातलील मानोली,बैलमपूर,जामणी,नोकारी,गोवारीगुडा,बॉम्बेझरी,लिंगनडोह, आसापूर,पेदासपुर आणि गढपांढरवनि अशा एकूण १० गांवातील १० जिल्हा परिषद शाळा व ११ अंगणवाडी तसेच गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि आदर्श हिंदी विद्यालय या ठिकाणी एकूण १५० भोजनपट्टी व 65 ग्रीन मॅट वाटप करण्यात आल्यात.

या मागील मुख्य उद्देश म्हणजे शाळेतील किंवा अंगणवाडीतील विध्यार्थी यांना खाली जमिनीवर जेवण किंवा कार्यक्रमा दरम्यान बसावे लागतात त्यावेळी त्याचे कपडे घाण होऊ नये तसेच घाण त्यांच्या शरीरात जाऊन त्यांची तब्बेत खराब होऊ नये हा होता.

या उपक्रमाला शाळेतील व अंगणवाडीतील मुख्याध्यापक,शिक्षक आणी विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते तर त्या सर्वांनी या बद्दल माणिकगढ, सी. एस. आर. चे आभार व्यक्त केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये