ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्तीनिमित्ताने व्यंकटी कांबळे यांचा सपत्नीक सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती : तालुक्यातील नगराळा येथील श्री अंब्रु नाईक आश्रम शाळेतील विषय सहाय्यक शिक्षक व्यंकटी कांबळे नियत वयोमानानुसार अलीकडेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने शाळेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

     सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव पंचफुला विठ्ठल जाधव होत्या. संस्था व शाळेच्या वतीने विषय सहाय्यक शिक्षक व्यंकटी कांबळे व त्यांच्या अर्धांगिनी जयमाला व्यंकटी कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कांबळे सरांचे सपत्नीक शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, भेटवस्तु देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

      याप्रसंगी प्रमुख पाहुणे एस.डी.वाटोरे, मुख्याध्यापक एच.जी.चुक्कलवार, घमाबाई आश्रम शाळा दमपूर मोहदाचे मुख्याध्यापक एस.टोंगे, एन.पी.वारकड यांची उपस्थित होती. सूत्रसंचालन एस.आर.खुसपुरे यांनी केले आभार व्हि.के.राठोड यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये