Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावतीत दोन हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांची प्रदर्शनी

लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत वर्षानिमित्त उद्या दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दोन हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

      देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतिमंदीर’ या उपक्रमाअंतर्गत सदर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीचे उद्घाटन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावर यांच्या हस्ते होणार आहे. तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये