ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदुर येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस व धन्वंतरी जयंती निमित्य गडचांदुर येथे जीएमपीए डॉक्टर्स असोसिएशन च्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस तथा धन्वंतरी जयंती 10 नोव्हेंबर ला उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रमुख अतिथी गडचांदूर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रदीप खेकडे, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ठाकरे, जेष्ठ सल्लागार डॉ. किशन भोयर, डॉ.ताणबाजी सोनटक्के, सचिव डॉ. कुलभूषण मोरे, सहसचिव डॉ.पंकज देरकर, डॉ. श्रीनिवास सोनटक्के, डॉ. निखिल ठाकरे, डॉ विशाल धोटे, डॉ.आरती पानघाटे, डॉ महेश हिरादेवे, डॉ.जयदीप चटप, डॉ. रोहित गोवारदिपे, डॉ. मुगावे तसेच नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कुलभूषण मोरे तर आभार प्रदर्शन सुमित कोंडेकर यांनी केले. प्रमुख अतिथी मान्यवरांनी आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंतीनिमित्त उपस्थिताना मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. सोनटक्के हॉस्पिटल व पंचकर्म रिसर्च सेंटर तर्फे अल्पोपहराची व्यवस्था केली होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये