ताज्या घडामोडी

राजुरा येथिल तालुकास्तरीय तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न कार्यशाळेचा समारोप

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

शिक्षण विभाग, पंचायत समिती राजुरा आणि सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न कार्यशाळेचे आयोजन गटसाधन केंद्र, पंचायत समिती राजुरा येथे करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मनोज गौरकार, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा, प्रमुख मार्गदर्शिका म्हणून शुभांगी लाड, जिल्हा समन्वयक, सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई आणि प्रमुख अतिथी म्हणून संजय हेडाऊ, विस्तार अधिकारी (शिक्षण), मुख्याध्यापिका छाया मोहितकर व सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व उपक्रम प्रमुख शिक्षक उपस्थित होते.

कार्यशाळेचे अध्यक्ष मनोज गौरकार यांनी माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या व्यसनाधीनतेचे त्यांना आलेले अनुभव कथन केले व राजुरा तालुक्यातील सर्व शाळा नव्या ९ निकषांची पूर्तता करून लवकरच तंबाखू मुक्त शाळा होतील, असा विश्वास व्यक्त केला. प्रमुख मार्गदर्शिका शुभांगी लाड यांनी दोन्ही टप्प्यात आयोजित केलेल्या कार्यशाळेचा व तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न शाळा उपक्रमाचा आढावा घेऊन समस्यांबाबत समर्पक मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक मनिष मंगरूळकर, विषय शिक्षक मूर्ती, जहीर खान, विषय शिक्षक पाचगाव, रामरतन चापले, स.शि. नलफडी, गिरीश कडूकर, माध्यमिक शिक्षक, शिवाजी हायस्कूल राजुरा, पि. एस. सालवटकर, जिजामाता हायस्कूल राजुरा यांनी तंबाखू विषयक भयावह सद्य:स्थिती विषद करून सविस्तर मार्गदर्शन केले.

केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सुचनेनुसार निश्चित करण्यात आलेल्या ९ निकषांचे पुरावे तंबाखू मुक्त शाळा या ॲप मध्ये अपलोड करण्याबाबत यथायोग्य दिशादर्शन मनिष मंगरूळकर यांनी केले. तर जहीर खान यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी विषद करून प्रत्यक्ष अंमलबजावणी बाबतचे नियोजन सादर केले.

तंबाखू मुक्त शाळा उपक्रमाची गरज व महत्त्व ह्यासंदर्भात भुमिका संजय हेडाऊ यांनी आपल्या प्रास्ताविकात मंडळी. कार्यशाळेच्या नियोजनबध्द आयोजनामध्ये पंचायत समिती राजुरा येथील सर्व विस्तार अधिकारी व सर्व केंद्र प्रमुख आणि सर्व विषय तज्ज्ञ मुसा शेख, राकेश रामटेके, रिता देरकर, गिता जांभूळकर, ज्योती गुरनुले, देवेंद्र रहांगडाले, राजकुमार भुरे, आशिष बहादुरे, मनिषा वांदिले, दिवाकर चाचरकर, डेटा एन्ट्री ऑपरेटर राहुल रामटेके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचलन मनिष मंगरुळकर ह्यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये