गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदेशी/देशी दारूची वाहतूक करणारे आरोपी अटकेत

एकुण किंमत ६ लाख ३३ हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा यांना दिनांक 26.07.2023 रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून यातील आरोपी नामे योगेश अनिलराव निनावे वय 28 वर्षे रा. रामनगर, वर्धा यांचे वर कारला रोड, वैष्वणी कॉम्पलेक्स वर्धा जवळ नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता त्याचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती सिल्वर रंगाची मारुती सुजुकी कंपनीची स्वीपट चारचाकी वाहन क्र.एम.एच/31/ सी.आर / 4400 अंदाजे किमंत 5,00,000/- रू त्या गाडीचे डिक्की मध्ये व मधातील सिटवर वेगवेगळ्या प्लॉस्टीक चुगडीत मध्ये 2) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॉयल स्टॅग कंपनिच्या 83 कॉचेच्या शिश्या 3 ) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस ब्लु कंपनिच्या 82 कॉचेच्या शिश्या 4 ) 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस कंपनिच्या 220 प्लॉस्टीक शिश्या 5) 90 एम.एल. च्या देशी दारूने भरून असलेल्या टॅगो कंपनिच्या 210 प्लॉस्टीक शिश्या असा एकुन 1,23,350 /- रु. 6) एक जुना वापरता काळया रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल कि. 10,000/- रू. असा एकुण जु. किंमत 6,33,350/- रू. चा माल विना पासपरवाना वाहतुक करीत असतांना मिळुन आला जप्त मुद्देमाल पंचनामा कार्यवाही प्रमाणे जप्त करून ताब्यात घेण्यात आला.

आरोपी योगेश अनिलराव निनावे वय 28 वर्षे रा. रामनगर, वर्धा यास सदरची देशी/विदेशी दारू कोठुन आनली या बाबत विचारपुस केली असता आरोपी यांनी सांगीतले की, देशी/विदेशी दारूचा माल हा मुकेश जयस्वाल रा. बोरगांव धांदे जि. अमरावती यांचे बोरगांव धांदे जि. अमरावती मधील रिलॅक्स वाईन बार मधुन आणला बार चे चालक / मालक मुकेश जयस्वाल यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपी क्र. 1 यास दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्यास सुध्दा आरोपी बनविण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन रामनगर, वर्धा येथे अपराध क्रमांक 658 / 2023 कलम 65 अ.ई. 77 अ, 82.83 म.दा.का चा गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन चे अधिकारी व क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा. याचे विषेश मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री रोशन पंडीत सा. यांचे सुचनेप्रमाणे, पो. उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.उप.नि संजय गायकवाड, नापोशि अमर लाखे, पो.शि. पवन निलेकर, मंगेष चावरे, समीर शेख, चेतन दुबे, प्रमोद वाघमारे यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

                (रोषन भु. पंडीत)

प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये