ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अनोळखी इसमाची आत्महत्या – ओळख पटविण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
दीनांक 05/०४/२४ रोजी BTS प्लॉट जवळ एक अज्ञात इसम वय अंदाजे 30-35 वर्ष,गहू वर्ण,उंची अंदाजे 5 फुट,अंगात नेव्ही ब्लू रंगाचा चेक्स असलेला शर्ट व कळ्या रंगाची पॅन्ट घातलेली असून सदर इसमाच्या उजव्या हातावर मोरपंख व बासुरी काढलेली असून Vicky असे इंग्रजीमध्ये लिहिलेले आहे व डाव्या हातावर सुद्धा Vicky असे इंग्रजीमध्ये गोंदलेले आहे तसेच उजव्या हातामध्ये पांढऱ्या रंगाचे स्टीलचे कडे आहे.
वर्णनाच्या इसमाने रेल्वेने रूळावर आत्महत्या केली आहे त्याचे शव उपजिल्हा रुग्णालय बल्लारपूर येथे शवगृहात ठेवण्यात आले आहे. सदर मयत इसमाची अद्याप पावेतो ओळख पटली नसून, ओळख पटल्यास संबधित क्रमांकावर कळवून सहकार्य करावे.ही विनंती.
संपर्क PSI चाटे पोस्टे बल्लारपूर मो न 9860601816