ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सण,उत्सव, शांततेत साजरे करा – पोलिस निरीक्षक संतोष महल्ले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 अवघ्या काही दिवसावर आगामी सण,उत्सव  रमजान ईद,गुढीपाडवा,थोरसमाज सुधारक महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याचबरोबर श्रीराम नवमी, महावीर जयंती हे धार्मिक सण,उत्सव शांततेत साजरे करा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांनी पोलिस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांतता समिती च्या सभेत बोलतांना केले.

2024 लोकसभा निवडणुक कालावधीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही तसेच सोशल मीडिया व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक यावर आक्षेपार्य पोस्ट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गय केल्या जाणार नाही जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गंभीर गुन्हे दाखल करण्यात येईल अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.

या सभेला नायब तहसिलदार आस्मा मुजावर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी प्रा,विनायक कुलकर्णी, सूरज गुप्ता, कविश जिंतुरकर, आकाश कासारे यांनी काही सूचना केल्या या सभेला पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये