ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमीत्य वर्धा जिल्हा पोलीस प्रदर्षनीचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     दिनांक 02 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन/रेजींग डे म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्या निमीत्याने वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक 02 ते 08 जानेवारी 2024 दरम्यान पोलीस अधीक्षक, कार्यालय तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत निरनिराळे कार्यक्रम घेवून महीला, वरिष्ठ नागरीक, लहान मुले, सर्वसामान्य नागरीकांमध्ये सुरक्षीततचे वातावरण तयार व्हावे यासाठी वृध्दाश्रम, षाळा व काॅलेजमधील विद्यार्थी, महीला यांच्यामध्ये जावून सलोखा निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच पोलीस विभागाच्या वेगवेगळया विभागाबद्यल माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे.

      त्यानिमीत्याने पोलीस मुख्यालय, वर्धा येथे पोलीस विभागातील सर्वच शाखांचे कामकाज व जनतेस त्याचा उपयोग याकरीता वर्धा जिल्हा पोलीस प्रदर्षनी लावण्यात आले आहेत. त्यामध्ये सायबर सुरक्षा, वाहतूक विभाग, शस्त्रे व दारूगोळा, पोलीस वाहने, डाॅग स्काॅड, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, अंमली पदार्थ जागृती, दामीनी पथक/ पोलीस काका व पोलीस दीदी, होम गार्ड, फाॅरेन्सीक व्हॅन टूल किट, बॅन्ड पथक, दंगल नित्रंयण साधने यांचे एकूण 16 स्टाॅल लावण्यात आले असुन सदर प्रदर्शनाचे उद्घाटन आज दिनांक 04.01.2024 रोजी सकाळी 11.30 वा. मा. श्री. पंकज भोयर (आमदार, वर्धा विधानसभा क्षेत्र) व मा. श्री. समीर कुणावार (आमदार, हिंगणघाट विधानसभा क्षेत्र) यांचे हस्ते करण्यात आले.

उद्घाटन समारंभाला मा. श्री. नूरूल हसन (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक वर्धा, मा. राहुल चव्हाण (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव तसेच पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी हजर होते. सदर प्रदर्षनी करीता वर्धा जिल्ह्यातील शाळांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असुन 2000 विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला आहे. सदर प्रदर्शनी आज संध्याकाळी 06.00 वाजता पावेतो व उद्या दि. 05.01.2024 रोजी सुध्दा सुरू असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी व सामान्य नागरिकांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन मा. पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी केलेले आहे.

 दि. 05.01.2024 रोजी वर्धा जिल्ह्यातील UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थी करीता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मार्गदर्शन षिबीरात प्रमुख मार्गदर्षक म्हणून मा. श्री. राहुल कर्डीले (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, वर्धा, मा. श्री. नूरूल हसन (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. राहुल चव्हाण (भा.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, मा. डाॅ. सागर कवडे (म.पो.से) अपर पोलीस अधीक्षक, वर्धा असे लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी सदर मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेण्याकरीता दिनांक 05.01.2024 रोजी दुपारी 03.30 वा. पोलीस मुख्यालय, वर्धा येथे हजर राहावे असे आवाहन मा. श्री. नुरूल हसन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी केलेले आहे.

 सदर वर्धा जिल्हा पोलीस प्रदर्षणी समारोप कार्यक्रम दि. 05.01.2024 रोजी संध्याकाळी 05.00 आयोजीत असुन सदर कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री, वर्धा जिल्हा असे हजर राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी व जनतेनी सदर कार्यक्रमाकरीता उपस्थीत राहावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये