ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बस चालकास मोटारसायकलस्वार कडून मारहाण

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकास मोटारसायकलस्वार कडून मारहाण केल्याची घटना देऊळगाव राजा शहरात जालना रोडवरील एम एस ई बी ऑफीस समोर ३० एप्रिल ला सायंकाळीं घडली, पोलिसांनी मोटासायकलस्वार विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जालना आगाराची बस क्रं एम एच ०६ एस ८७१४ चे चालक सुधीर विठ्ठल राठोड(३५) देऊळगाव राजा येथुन जालना येथे घेऊन जात असताना एम एस ई बी ऑफीस समोर मोटर सायकल स्वार गजानन अंभोरे मोटर सायकल क्रं एम एच २८ ए के ७५४० बस समोर एकदम आडवी लावून बस चालकास विनाकारण शिवीगाळ करून तोंडावर, पाठीवर, चापटा बुक्क्यांनी मारहाण केली, डावा पाय ओढून जखमी केले.

शासकीय कामात अडथळा निर्माण केला, बस चालक सुधीर राठोड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मेडिकल रिपोर्ट वरून आरोपी गजानन अंभोरे रा. देऊळगाव राजा यांच्या विरोधात भा द वी कलम ३४१,३५३,३३२,२९४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये