माणिकगड सिमेंट वर्क्स खाणीत ‘जनजाती गौरव पंधरवडा’ उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माणिकगड सिमेंट वर्क्स खाणीत जनजाती गौरव पंधरवडा (१–१५ नोव्हेंबर २०२५) अंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश महान आदिवासी वीर बिरसा मुंडा यांच्या प्रेरणादायी जीवन, संघर्ष आणि योगदानातून आदिवासी तसेच इतर समाजघटकांना प्रेरणा देणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित भाषण स्पर्धा घेण्यात आली. स्थानिक आदिवासी समाजातील नागरिक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना सन्मानित करून त्यांचे मनोबल वाढविण्यात आले.
सी एस आर अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या कंप्यूटर वर्ग आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्र येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यामुळे स्थानिक युवकांना बिरसा मुंडा यांच्या जीवनमूल्ये व ऐतिहासिक योगदानाची माहिती मिळाली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माइन्स प्रमुख श्री. संतोष तिवारी, माइन्स विभाग प्रमुख प्रदीप कुमार रॉय,माइन्स विभाग प्रमुख श्री. सुनील अल्लेवार, नोकारी उपसरपंच श्री. वामन तुरानकर तसेच सी एस आर टीममधील श्री. शांतनू आकाश,श्री. संगीत चांदेकर हे उपस्थित होते.
याशिवाय, सी एस आर अंतर्गत कार्यरत प्रशिक्षक परचाके मॅडम देखील उपस्थित होत्या त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व यशस्वी ठरला.



