ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली येथे विनामूल्य मोतीबिंदू तपासणी शिबिर

महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

               सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम,आरोग्य विभाग चंद्रपूर, यांचे संयुक्त विद्यमाने महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली द्वारा दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोज रविवारला विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन विश्वशांती विद्यालय सावली येथिल प्रांगणात केले आहे.

      सदर शिबिरात निवडलेल्या रुग्णांची मोफत भिंगारोपण शस्त्रक्रिया सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२४रोजी सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजच्या नेत्र तज्ञांच्या हस्ते होणार आहे. शिबिराला प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉ.शुक्ला,डॉ.देवानंद, एन.सी.भंडारी,इंजिनियर दिलीप भंडारी,वीर हरीश मुथा,वीर मनीष खटोड,विभागीय अध्यक्ष प्रकाश खजांची,तालुका अध्यक्ष मनोज ताटकोंडावार,सचिव राहुल मेरुगवार यांचे मुख्य मार्गदर्शन लाभणार आहे.

          रुग्णांनी येताना सोबत आधार कार्ड,रेशन कार्ड,वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत आणावे तसेच कोविड -१९ च्या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.

         मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मागील सोळा वर्षापासून महावीर इंटरनॅशनल सावलीतर्फे हे सामाजिक उपक्रम राबवत असून आजपर्यंत हजारो रुग्णांनी विनामूल्य डोळे तपासणी शिबिर तसेच कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेतलेला आहे. आयोजित विनामूल्य डोळे तपासणी शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली च्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये