ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाकाबंदी, कोबींग ऑपरेशन विशेष मोहीम

मोटार वाहन कायदयांतर्गत एकुण ७४ केसेस करण्यात आल्या आहेत.l

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. पोलीस अधिक्षक साहेब, वर्धा यांचे निर्देशानुसार वर्धा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा तसेच १९ पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीसांनी दिनांक २२.०७ २०२३ रोजी रात्री २०.०० वा. पासुन दि. २३.०७.२०२३ चे पहाटे ०४.०० वा. पर्यन्त नाकाबंदी, कोंबींग ऑपरेशन, विशेष मोहीम राबवुन अवैध दारु गांजा, अंमली पदार्थ, जनावरे इत्यादी विकी / वाहतुक / उत्पादन / बाळगणे यावर प्रतिबंध घालण्यासंबंधाने कारवाई तसेच मोटर वाहन कायदयान्वये विविध कलमान्वये वाहन चालकावर / मालकावर कारवाई, ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह केसेस करण्यात आली.

तसेच चोरी, जबरी चोरी, व दरोडा यावर आळा घालण्यासाठी हीस्ट्रीशीटर, सराईत गुन्हेगार, रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करण्यात आले. मोहीम एकत्रीत रित्या वर्धा जिल्हा पोलीसातर्फे राबविण्यात आलेली आहे.

१९ पोलीस स्टेशन अंतर्गत तसेच स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीसांनी नाकाबंदी, कोंबींग ऑपरेशन विशेष मोहीमेदरम्यान सदर मोहीमेत २८ पोलीस अधिकारी, १६० पो. अंमलदार व ६४ गृहरक्षक एवढे मनुष्यबळ लावण्यात आले. २० दारुबंदी कायदयान्वये केसेस ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह अंतर्गत ०७ केसेस, लहान / मोठी अशी एकुण ५९७ वाहने तपासण्यात आले तसेच मोटार वाहन कायदयांतर्गत एकुण ७४ केसेस करण्यात आल्या आहेत. यापुढेही नाकाबंदी, कोबींग ऑपरेशन विशेष मोहीम राबवुन प्रभाविपणे कारवाई करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये