ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

माळी संघटनेतर्फे स्वछतादूत प्रशांत तावाडे यांचा सत्कार

सर्व स्तरावरून प्रशांत तावाडे यांचे होत आहे कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथे सावली तालुका माळी संघटनेतर्फे तालुक्यातील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व युवा सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी विचारमंचावर डॉ.अभिलाषा गावतुरे,प्रा.नामदेव जेंगठे, अभिजित मोहुर्ले, सोमनाथ वाढई, सावली तालुका माळी समाज संघटनेचे अध्यक्ष अतुल लेनगुरे, नगरसेविका साधना वाढई, प्रल्हाद कावळे, प्रा.सुरेश लोणबले लक्ष्मन चौधरी आदी उपस्थित होते.

याच दरम्यान सावली येथील स्वच्छतादूत म्हणून परिचित असलेले प्रशांत तावाडे यांचा डॉ.अभिलाषा गावतुरे व उपस्थित मंचावरील मान्यवर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.स्वच्छ भारत अभियान सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.

शासनाच्या या उपक्रमात नागरी स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आपआपल्या परीने स्वच्छतेचे काम करीत आहेत पण सावली येथिल प्रशांत तावाडे हे नेहमीच सामाजिक कामात पुढाकार घेत असतात.या स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी होऊन मुख्य रस्ता, चौक नित्य नेमाने स्वच्छ करीत असतो या कामाचे सर्व स्तरावरून प्रशांत तावाडे यांचे कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये