Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारगुंडी येथे शालेय साहित्याचे व खाऊ वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गारगुंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व खाऊचे वाटप करण्यात आले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश खांडेभराड यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक व पत्रकार प्रा अशोक डोईफोडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री प्रकाश खांडेभराड, शिक्षक श्री गणेश इलग व शारदा डोईफोडे उपस्थित होते.

प्रकाश खांडेभराड व प्रा अशोक डोईफोडे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रा अशोक डोईफोडे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्याना कठोर परिश्रम घेत अभ्यास करून संस्कारक्षम नागरीक बना असे सांगितले. प्रकाश खांडेभराड यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्याना चांगले शिक्षण घेत आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध रहा असे सांगितले.

संचालन व आभारप्रदर्शन गणेश इलग यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये