ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोखरा योजनेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश., शेतकऱ्याना नवसंजीवनी

कृषीमंत्री/ पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

         महाराष्ट्र राज्यामध्ये आत्महत्याग्रस्त व दुष्काळ जुलै पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्याचे समावेश या योजनेत करण्यात आला होता ही योजना १६ जिल्ह्यामध्ये प्रभावी ठरल्याने व शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बदल घडल्यामुळे विदर्भातील पूर्व भाग दुष्काळ आत्महत्याग्रस्त असताना सुद्धा या जिल्ह्याचा समावेश झालेला नव्हता याकरिता गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सामाजिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी नागपूर अधिवेशनात शेतकरी शिष्टमंडळासह भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश पोखरा योजनेत करावा.

यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन मागणी केली होती रास्त मागणी असल्याने दोन्ही मंत्रीमहोदयांनी सकारात्मक पुढाकार घेत चंद्रपूर जिल्ह्याचा यासह नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली या पाच जिल्ह्यांचा समावेश नानाजी देशमुख नव संजीवनी योजनेमध्ये समाविष्ट केल्याने पहिल्या टप्प्यातील सोळा जिल्हे व नवीन पाच जिल्हे अशा 21 जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना बळकटी जमिनीची सुपीकता टिकवण्यासह पाण्याचे नियोजन व इतर वैयक्तिक व सामूहिक योजनेकरिता 6000 कोटीची तरतूद करून तत्वता शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासन निर्णय क्रमांक नादेकृ ४६२२ / प्रक्र . ९४ / ८ए दि १४ आक्टोंबर २०२४ शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील 519 गावाचा समावेश करण्यात आला असून कोरपणा तालुक्यातील यापूर्वी मानव विकास योजनेमध्ये समाविष्ट नसल्याने पोखरा योजनेत समावेश करावा.

यासाठी सतत शेतकऱ्यांची मागणी होती कोरपना तालुक्यातील34 गावाचा समावेश योजनेमध्ये करण्यात आला असून नानाजी देशमुख नव संजीवनी योजनेतून उत्पादन वाढ आधुनिक शेती नवीन तंत्रज्ञानाचा वापर कर कर्बवाढ जमिनीची सुपीकताटिकवण्यामध्ये हा प्रकल्प प्रभावी ठरणार असून शेतकऱ्यांनी शासन निर्णयाचा स्वागत केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये