ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात स्वयंशासनाचा कार्यक्रम संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे ५ सप्टेंबरला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्य अध्यक्ष स्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरे होते,प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,प्रा नंदाताई भोयर उपस्थित होत्या.

सर्वप्रथम सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले,याप्रसंगी धनंजय गोरे यांनी डा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, शिक्षक दिन चे महत्त्व सांगितले,शिक्षक दिनाचे औचित्य साधून कनिष्ठ महाविद्यालयात स्वयं शासन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आजचा दिवस विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी ही भूमिका स्वीकारून विद्यालयाचा संपूर्ण कारभार सांभाळाला. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भाग घेतला. संचालन व आभार प्रदर्शन प्रा नरेंद्र हेपट यांनी केले,याप्रसंगी विद्यार्थी,शिक्षक,व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये