ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन देवळी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणावर अड्डावर धाड टाकून केली कार्यवाही

3 लाख 12 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 10/9/2026 रोजी पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील असलेल्या रत्नपूर गावाजवळून जाणाऱ्या नागपूर तुळजापूर महामार्गच्या पुलाखाली काही ईसम 52 पत्यांचा जुगार खेळत आहे अशी गुप्त माहिती मिळताच आरोपीवर जुगार कायद्यान्वये रेड केली असता जुगार साहित्य रोख रक्कम व गुन्हात वापरलेली 6 मोटारसायकल मिळून एकूण किंमत 3,12,509/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एकूण 10 आरोपीविरुधद पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वंदना कारखेले पुलगांव पोलीस स्टेशन देवळीचे पोलीस निरीक्षक नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश मगरे पोलीस शिपाई अमित पटले गणेश पवार यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये