ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वृद्ध व आजारी महिलेच्या मदतीसाठी गावकऱ्यांचे मदतीचे हात पुढे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- कोरपना तालुक्यातील धानोली गावातील शामराव कूळसगे यांच्या वृद्ध व आजारी पत्नीच्या मदतीसाठी गावकऱ्यांनी माणुसकीच्या भावनेतून पुढाकार घेत मदतीचे हात पुढे केले. अडचणीच्या काळात एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची गावकऱ्यांची ही भावना कौतुकास्पद ठरत आहे.

शुक्रवारी, ११ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी गावातील नागरिकांनी आपल्या परीने सहकार्य केले. या मदतीमुळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, संकटाच्या काळात गावकऱ्यांनी दाखविलेली आपुलकी, माणुसकी आणि एकजूट विशेष उल्लेखनीय ठरली.

यावेळी गाव पाटील दौलतराव मंगाम, सरपंच वैशालीताई रामकिसन मडावी, चंद्रभान किन्नाके, सामाजिक कार्यकर्ते लिंगा वेटी आणि पोलिस पाटील सुषमा किन्नाके यांच्या हस्ते कूळसगे कुटुंबीयांना रोख आर्थिक मदत देण्यात आली.

या सामाजिक कार्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात सहकार्य करणाऱ्या सर्व मदतीच्या हातांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. गावाच्या अडचणीच्या काळात नागरिकांनी एकत्र येऊन मदत करण्याची ही परंपरा अशीच कायम राहावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

“गावाच्या मदतीसाठी पुढे आलेला प्रत्येक हात, हीच आपल्या मातीची खरी ताकद!” या भावनेतून धानोली गावकऱ्यांनी एकजुटीचा आणि माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये