Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावतीत श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचा जागतिक पारायण सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       जागतिक पारायण समिती भद्रावतीच्या वतीने शहरातील मुरलीधर पाटील गुंडावार सभागृहात दिनांक 12 रोज रविवारला सकाळी सहा वाजता श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाच्या जागतिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या पारायण सोहळ्यात शहरातील जवळपास 200 गजानन भक्तांनी सहभाग घेत श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण केले. पारायण सोहळ्याच्या निमित्ताने सभागृहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात श्री चा अभिषेक तथा इतर धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता. याशिवाय सभागृहातून श्री च्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

या शोभायात्रेत शहरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पारायण सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी जागतिक पारायण सोहळा समिती भद्रावतीच्या सर्व पदाधिकारी तथा सदस्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये