ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भीमराव हनुमंते यांचे मरणोत्तर नेत्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी धर्मराज हनुमंते यांचे काका व देऊळगाव राजा नगरपरिषद मधील सेवानिवृत्त कर्मचारी सुशील हनुमंते यांचे वडील भीमराव हनुमंते यांचे वयाच्या 91 व्या वर्षी वृद्धप काळाने दिनांक 25 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले मृत्यु पश्चात त्यांचा मुलगा सुशील हनुमंते यांनी वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व देऊळगाव राजा येथील जायंटस परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा व सन्मती जैन यांना सदर निधनाची माहिती देऊन वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याबाबत कळविले त्यावरून यांनी जालना येथील गणपती नेत्रालयाचे चमूस बोलावून मृतक भीमराव बाळाजी हनुमंते यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले यावेळी गणपती नेत्रालयाच्या नेत्रतज्ञ डॉक्टर निधी लाटकर व त्यांची टीम यांनी यशस्वी शस्त्र क्रिया करून नेत्रदान करून घेतले मृत्यु पश्चात त्यांच्या कुटुंबात बराच मोठा आप्त परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये