ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कमल स्पोर्टीग क्लबद्वारा महाशिवरात्री पर्वावर साबुदाना खिचडी वितरण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व अन्य क्षेत्रात अग्रेसर कमल स्पोर्टीग क्लब, चंद्रपूरच्या वतीने दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०६.३० वाजता महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर श्री अंचलेश्वर मंदिर परिसरामध्ये शिवभक्त भाविकांना साबुदाना खिचडी व फळ वितरण कार्यक्रम पार पडला. कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते खिचडी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास भागवताचार्य पुजनीय मनिष महाराज, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, श्यामल अहीर, राजु घरोटे, सुदामा यादव, राहुल गायकवाड, जगदिश दंडेले, शैलेश दिंडेवार, मयुर भोकरे, विक्की लाडसे, कमल कजलीवाले, प्रविण चुनारकर यांचेसह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचा लाभ शेकडो शिवभक्त भाविक व आबालवृध्दांनी घेतला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये