Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

मोफत आरोग्य शिबीर राबवून केले महामानवास अभिवादन

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

         स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने दि.०६ डिसेंबर ला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामिण रुग्णालय भद्रावती यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ मोफत आरोग्य शिबिर राबवून बाबासाहेबांना अभिवादन केले.

     या शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला. यामध्ये २५० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह आणि ECG तपासणी करण्यात आल्या. तसेच आयुष्यमान कार्ड काढून देण्यात आले.

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती भद्रावतीच्या वतीने या शिबिराला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे, नागरिकांचे तसेच ग्रामिण रूग्नालय भद्रावतीच्या सर्वं चमुचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती भद्रावतीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. व यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम समितीच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये