ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रकच्या धडकेत युवक ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना – गडचांदूर कडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकच्या धडकेत एका एकोणविस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक ७ ला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राजुरा – कोरपना राष्ट्रीय महामार्गावरील कातलाबोडी फाट्या जवळ घडली.

अमीर शेख (१९) रा. चनापुर तहसील अर्धापूर जिल्हा नांदेड असे मृतकाचे नाव आहे. तो दुसऱ्या एका सिमेंट ट्रक वर क्लीनर म्हणून आला होता. जेवणासाठी त्यांनी महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने धाब्यासमोर ट्रक थांबविला. दरम्यान परिसरातील एका धाब्यातून तो पोळ्या घेऊन परत येत असताना महामार्ग ओलांडतानी गडचांदूर कडून आदिलाबाद कडे जाणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक टी एन १८ ए क्यू ०६२७ ने त्याला धडक दिली. यात डोक्याला व हाताला गंभीर इजा पोहचल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून तातडीने मृतदेह उर्वरित तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे शव विच्छेदनसाठी पाठविला. घटनेची माहिती कळताच घटना स्थळी व ग्रामीण रुग्णालय समोर मोठी गर्दी नागरिकांची झाली होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये