मुधोलीत आरोग्य सेवेचा बोजवारा : शिवसेनेचे तालुका वैद्यकीय अधिकार्यांना निवेदन
तत्काळ दोषींवर कठोर कारवाई करा : सिंगलदीप पेंदाम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील मुधोली ग्रामपंचायत येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागला. दवाखाना सुरु असतानाही तेथे डॉक्टर, नर्स तसेच इन्चार्ज अनुपस्थित असल्याने रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यात मोठा त्रास सहन करावा लागला.
या निष्काळजीपणाबाबत शिवसेनेच्या वतीने भद्रावती उपतालुका प्रमुख श्री. सिंगलदीप पेंदाम यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तक्रारीचे निवेदन सादर केले.
निवेदन स्वीकारतांना तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी आश्वासन दिले की, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात येईल व संबंधित अधिकारी व कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
शिवसेना नेहमीच जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर ठाम पणे आवाज उठवत आली आहे व पुढेही नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी शिवसैनिक सुरज भाऊ शाहा, युवा शिवसैनिक सुमित हस्तक, कदीर खान पठाण, राज चव्हाण उपस्थित होते.