आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल मध्ये प्लेस्कूलची सुरवात

चांदा ब्लास्ट

चांदा पब्लिक स्कूल येथे प्लेस्कूल विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी सामाजिक जीवनातील पहिलं पाऊल टाकत असते. मुलांचे चारित्र्य घडविण्यात व त्यांच्या भविष्यासाठी भक्कम पाया उभारण्यात शाळा ही महत्त्वाची भूमीका बजावते.

कार्यक्रमाची सुरूवात शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. चिमुकल्यांचा उत्साह वाढविण्याकरीता त्यांचे त्यांच्या पालकांसोबत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. यात पालकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन बालपणातील सुखद क्षणांचा अनुभव घेतला.

चिमुकल्यांचे आनंदी चेहरे व बोबड्या बोलांनी शाळेचा आनंद द्विगुणित झाल्यासारखा वाटु लागला असे शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी आपल्या शब्दांमध्ये व्यक्त करून त्यांचे व पालकांचे स्वागत केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी चिमुकल्यांना पुढील वाटचाली करीता प्रेरणा दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका मनिषा नागोशे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका श्वेता मच्छा यांनी केले. विविध खेळांचे आयोजन क्रिडा शिक्षक विनोद निखाडे व प्रनोती चौधरी यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरीता पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये