पोस्टे वर्धा शहर हद्दीतील अवैधरित्या चालणाऱ्या व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई
संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नमुद दोन्ही पंच, आम्ही, सोबत पो.स्टॉफ पो.हवा. / 148 गजेंद्र धर्मे, पो. हवा/1444 नरेद्र कांबळे, पो. हवा /1378 प्रशांत वंजारी, पो.अंम. / 1342 असे शासकीय चारचाकी वाहनाने नमुद ठिकाणी गेलो असता एका पडदा लागलेल्या गाळयासमोर काही लोक उभे दिसुन आले. पोलीस गाडी पाहताच त्या गाळयासमोर असलेले व गाळयातुन बाहेर येवुन काही लोक पळुन गेले. खबरेतील नमुद व्हिडीओ गेम पार्लर हेच असल्याची खात्री झाल्याने पंचासह सदर गाळयामध्ये जावुन पाहणी केली असता तेथे एक ईसम बसुन दिसल्याने त्यास ताब्यात घेवुन पंचासमक्ष नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव रोहीत किशोर अरक वय 32 वर्ष रा. हिंगणघाट फैल, पुलगांव असे सांगीतले. त्यास सदर व्हिडीओ गेम पार्लर बाबत विचारपुस केली असता, त्याने सदर गाळा हा प्रविण वाघमारे रा. हिंगणघाट यांनी किरायाने घेतलेला असुन त्यांचे सांगणेवरूनच तो या ठिकाणी व्हिडीओ गेम पार्लर चालवित असल्याचे सांगीतले. सदर ठिकाणी चालु स्थितीत असलेल्या 10 व्हिडीओ गेम मशिन भिंतीला लागुन दिसुन आल्या त्यापैकी तीन लाकडी बॉक्सच्या मोठ्या व्हिडीओ गेम मशिन असुन सात लहान व्हिडीओ गेम मशिन भिंतीला लटकुन दिसुन आल्या.
तसेच प्रत्येक मशिनसमोर स्टुल/खुर्ची ठेवुन असल्याचे दिसुन आले. सदर व्हिडीओ गेम पार्लर चे परवान्याबाबत हजर असलेल्या ईसमाला विचारपुस केली असता कोणत्याही प्रकारचा वैध्य परवाना सादर केला नाही. पंचासमक्ष सदर ईसमाची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत एक वनप्लस मोबाईल स्मार्टफोन व नगदी 6800 रू मिळुन आले. मिळुन आलेला मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त करुन आरोपी व मुद्देमालासह पोस्टेला येवुन आरोपीविरुध्द गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास पोउपनि शरद गायकवाड करीत आहेत.



