ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोर नदीत फिट येऊन पडल्याने ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नदीकाठी शौचास गेलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाला अचानक फिट आल्याने, तो पाण्यात पडून त्याचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज, ३ एप्रिल रोजी सकाळी हिंगणी येथे घडली. याप्रकरणी सेलू पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणी येथील रहिवासी असलेला ३५ वर्षीय युवक दिनेशसिंग गायकी आज सकाळी बोर नदीच्या पात्राजवळ शौचास गेले होते . नदीकाठावर असताना त्याना अचानक फिट (अपस्मार) आली, ज्यामुळे त्याचा स्वतःवरील ताबा सुटला आणि तो तोंडावर पाण्यात पडले पाणी खोल असल्याने आणि शरीर साथ देत नसल्याने त्याचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती सेलू पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

  मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

 ही संपूर्ण कारवाई ठाणेदार देवेन्द्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पोलीस करीत आहेत.

या घटनेमुळे हिंगणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तरुणाच्या अकाली निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये