ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचा सामाजिक उपक्रम

दान पावले हो...या भारुडच्या माध्यमातून 'मरावे परी किर्तीरूपी अर्थात देहरूपी उरावे', हा सामाजिक संदेश व जनजागृती

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर व दान पावले हो फाऊंडेशन, नागपूरच्या संयुक्त विद्यमाने देहदान, अवयव दान, नेत्रदानावर आधारीत हा जनजागृतीपर कार्यक्रम येथे पार पडला. नागपुरच्या महिला कलावंतांनी दान पावलं हो….हे “भारूड” सादर करून अवयव दान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचा संदेश दिला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात अतिशय अप्रतिम भारूड सादर करून रसिकश्रोत्यांना मंत्रगुग्ध केले. तसेच मरावे परी किर्तीरूपी अर्थात देहरूपी उरावे, हा सामाजिक संदेश दिला.

शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आझाद बगीच्यात सकाळी सात वाजताच्या सुमारास दान पावलं हो या भारूड रूपी कार्यक्रमाला सुरूवात झाली. मंचावर रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अनुपकुमार यादव. प्रोजेक्ट डायरेक्टर नरेंद्र बुरांडे, दान पावले हो फाऊंडेशनच्या पदाधिकारी तथा भारूडच्या लेखीका सौ.अनद्या अरूण वेखंडे, शोभा बावणकर उपस्थित होत्या. पाहुण्यांचे स्वागत आझाद बगीच्या योगा ग्रुपचे श्री धकाते, गोपी खोब्रागडे व कमल कच्छवा यांनी केले. अनुप यादव यांनी रोटरी क्लब या सामाजिक संस्थेची माहिती देतांनाच चंद्रपूर शहरात आजवर राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक प्रकल्पांची माहिती दिली.

त्यानंतर प्रमुख कलावंत तथा लेखीका सौ.अनद्या वेखंडे, निलिमा देशपांडे, शोभा बावनकर, रेशा भारव्दाज, वनिता मुंगलेवार, वैशाली चरपे, भारती देशमुख, अबोली कुळकर्णी, माधुरी पाखमोडे व संगीता शंडे या दहा महिला कलावंतांनी भारूड सादर करून अवयव दानाचा संदेश दिला. अतिशय विनोदी ढंगात साध्या व सोप्या रूपकांमधून अनद्या वेखंडे यांनी अवयव दानाचे महत्व पटवून दिले. माणसाच्या मृत्युनंतरही शरीरातील डोळे, हात, पाय, त्वचा पासून तर ऱ्हदय, किडणी, यकृत दान करून मरावे परी किर्तीरूपी अर्थात देहरूपी उरावे, हा सामाजिक संदेश दिला. केवळ शरीरातील अवयवांचेच दान करू नका तर मृत्युनंतर देहदान सुध्दा करा असाही संदेश दिला. विशेष म्हणजे ब्रेन डेड व निरोगी व्यक्तीच अवयव दान करू शकतात, पाण्यात बुडून मृत्यु पावलेला, एचआयव्ही बाधित किंवा अन्य गंभीर आजार झालेल्या व्यक्तींनी अवयव दान करू नये असेही या भारूड पद्यनाट्याच्या माध्यमातून सांगण्यात आले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या श्रोत्यांकडून तसेच उपस्थितांकडून देहदान, नेत्रदान व अवयव दानाचे फार्म भरून घेण्यात आले.

यावेळी प्रकाश गुंटेवार यांनी त्यांच्या शरीरात यकृत ट्रान्सप्लाटचा अनुभव उपस्थितांना सांगितला. देहदानाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात ३५० ते ४०० लोक सहभागी झाले होते. विशेषत्वाने यात महिलांचा सहभाग अधिक होता. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे माजी अध्यक्ष डॉ.विजय आईंचवार, माजी अध्यक्ष सचिन गांगरेड्डीवार, अजय पालारपवार, संजय अग्रवाल, डॉ.सुशील मुंधडा, मनिषा पडगिलवार, मनिष बोराडे, अविनाश रघुसे, मिलिंद बोडखे, नविन चोरडीया, आचल यमसनवार, राहुल खटोड उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये