ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी मिशन आयएएस द्वारा सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना येथिल वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे सेवानिवृत प्राचार्य संजय ठावरी यांना नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी द्वारा सन्मानित करण्यात आले. कोरपना तालुक्यात मि आयएएस होनारच.,

या कार्यशालेचे आयोजन ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर ला अकरा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनि आयोजन केले होते. दरम्यान मिशन सेवा अभ्यासीका कोरपना येथे १० वी १२ वी नंतर पुढे काय ? तसेच एमपीएससी, यूपीएससी परीक्षा मार्गदर्शन कार्यशाला त्यांनी आयोजित केली होती त्यात डॉ.नरेशचंद्र काठोडे संचालक डॉ पंजाबराव देशमुख आयएएस एकेडमी अमरावती यांनी विद्यार्थी व पालकाना मि कलेक्टर होनार यावर मार्गदर्शन केले तर, करीअरवाला पुस्तकांचे लेखक प्रा. विजय मुसले यांनी मार्गदर्शन केले. सेवेत असताना एकच ध्यास गुणवत्ता विकास हे ध्येय उराशी बालगुन गुणवत्तापूर्ण शिक्षन देन्याचे कार्य केले, स्पर्धा परीक्षेशाठी माजी विद्यार्थी यांस प्रवृत्त केले, कोरपना येथे वातावरण निर्मिति झाली आपल्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव लौकिक केले आज अनेक विद्यार्थी त्या मार्गावर आहे मुले कायम, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तिनुसार स्वत: प्रशासकीय सेवेत लागली तरी इतराना उपदेश करीत आहे, जून २०१८ ला स्कॉलर्स सर्च एकेडमी वणी रोड येथे तालुकास्तरीय मि आयएएस होनार.,

ही आपल्या स्नेहीजनाच्या सहकार्यन डॉ. काठोडे सर यांची कार्यशाला आयोजित केली होती. सेवानिवृतीनंतर ही मूलाना, पुस्तक वितरीत करुण उपदेश करित असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन मिशन आएएएस तरफे कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबददल विधान परिषद सदस्य नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले व डॉ.नरेशचंद्र काठोडे यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवीन्यात आले. मागील वर्षी स्टुडेंट फोरम ग्रुप तर्फे स्व मोरेश्वरजी टेभुर्डे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते,तर ज्येष्ठ नागरिक मंडल काटोल द्वारा मागील वर्षी सन्मान कर्तुत्वाचा पुरस्कारासाठी जिल्ह्यातून निवड झाली व शिक्षक दिनी पुरस्कार वितरण करण्यात् आले. नुकतेच त्यांनी प्रभु रामचन्द्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा, एमिनेंस कॉन्वेंट कोरपना, सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर, प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालय, लालबहादुर शास्त्री विद्यालय, स्कॉलर्स सर्च एकेडमी, स्व संगीता चटप कनिष्ठ महाविद्यालय कोरपना, शारदा कनिष्ठ महाविद्यालय धानोली, स्व भाऊराव पाटील चटप माध्य. आश्रम स्कूल, महात्मा गांधी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाला आयोजित केल्या.

ते मुख्य संयोजक होते. त्यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कृत केल्याने परीसरातील सर्व स्तरातुन स्नेहीजन, माजी विद्यार्थी, मुख्या. प्राचार्य, शिक्षक करीअर ग्रुप चे सदस्य यानि अभिनंदन केले आहे.सामाजिक कार्यात नेहमी ते हिरीरीने भाग घेतात हे विषेश..

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये