ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगांवराजात लाठीमारच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चासह सर्वपक्षीयाकडून शहर कडकडीत बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगांव राजा : जालना जिल्ह्यातील अंतरवाल येथे झालेल्या लाठी चार्जचा निषेध करीत जन आक्रोश मोर्चा सह देऊळगाव राजा येथे सर्वपक्षीयाकडून शहर बंद ची हाक देण्यात आली जन आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मेन रोडने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून राष्ट्रसंत प्लाझापासून शनिवार पेठ, जुनी नगरपालिका चौक, अहिंसा मार्ग, मेन रोड, ने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाची सांगता झाली यावेळी मोर्चादरम्यान शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.व राजीनामा द्यावा अशा घोषना देण्यात आल्या

शहर बंद साठी व्यापारी आणि व्यवसायिक यांनी ही स्वयंस्फूर्तीने बंद मध्ये सहभागी होत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली सर्वांच्या सहकार्याने जन आक्रोश मोर्चा आणि बंद शांततेत पार पडला

यावेळी आमदार डाॅ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डाॅ. शशिकांत खेडेकर फुले शाहू आंबेडकर आझाद विचार मंच संस्थापक अध्यक्ष डाॅ. रामप्रसाद शेळके, विष्णू रामाणे, अनिल चित्ते, लक्ष्मण कव्हळे, मनोज कायंदे, गणेश सवडे, हरीभाऊ शेटे, राजेश इंगळे, गंगाधर जाधव, हष॔वध॔न देशमुख, अॅड नरोडे,अॅड अर्पित मिनासे, अॅड रामाणे,धनंजय मोहिते राजीव सिरसाठ, रामविजय नरोडे, संतोषराजे, नितेश देशमुख, अॅड अनिल शेळकेव सर्व मराठा महासंघाचे व सर्व जाती-धर्माचे लोक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये