ताज्या घडामोडी

मोटारसायकलची चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

चिखली महामार्गावरील शिवनेरी धाब्याजवळून मोटारसायकल अज्ञात चोराने लंपास केल्याची घटना 7 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी गजानन सखाराम काकडे रा मेहुणा राजा यांनी त्यांची हिरो होंडा एच पी डिलक्स कंपनीचीं आकशी रंगाची मोटार सायकल क्रं MH28AV0391 किंमत 18,000/रु शिवनेरी ढाब्या, देउळगाव राज ते चिखली रोड येथे उभी करुन त्यांचे शेतामधुन पाणी देवुन परत ते मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांची मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही. कोण्यातरी अज्ञात चोराने चोरुन नेली , चोरीची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल साळवे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये