ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांचा कंपनीवर उद्या धडक मोर्चा

धडक मोर्च्याला विविध पक्षाचा पाठिंबा

चांदा ब्लास्ट

भूमिपुत्र संघटनेच्या वतीने घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या मागण्यांवर योग्य ती साकारात्मक चर्चा न झाल्याने  दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात येत  असून मोर्चाला विविध पक्षानी पाठिंबा  दिला आहे.

घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवक व युवतींना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीत सामावून घेणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो, म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कंपन्यांवर कारवाई करणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घुग्घूस ते पांढरकवडा पांदन रस्ता आणि घुग्घूस ते सेनगाव पांदन रस्तावर केलेला अतिक्रमण हटवणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने शहर व ग्रामीण भागात सन २०१३ पासून ते आजपर्यंत CSR फंडातून केलेल्या खर्चाची कार्याची चौकशी करणे, जिल्ह्याधिकारी यांनी सदर लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करणे, विस्तारीकरणात ज्या शेतकऱ्याच्या जमिनी कंपनी अधिग्रहित करते त्या जमिनींचा मोबदला हा शेतकऱ्यांना थेट मिळावा, कंपनीचे अधिकारी यांनी विस्तारीकरणाच्या जनसुनानीच्या नोटिफिकेशनमध्ये जाहीरपणे सांगितले की कंपनीच्या परिसरात किमान दोन लाख वृक्षारोपण करण्यात आले असे खोटे व चुकीची माहिती सादर केलेल्या कंपनीवर कडक कारवाई करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि त्यांना योग्य पगार किमान ₹२०,००० ते ₹२५,००० रुपये देण्यात यावे, कंपनीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी अनेक लोकवस्तीचे पुनर्वासन करताना सर्वे क्रमांक १६७ आराजी ६३.६७३७ चौ.मी. एकूण ६२ प्लॉट रहिवासा करिता पुरावतीत आहे. जमिनीचे पट्टे देऊ असे खोटे आश्वासन कंपनी मार्फत देऊन त्या लोकवस्तीना स्थलांतरित करण्यात आले, लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून होत असल्याने दुर्घटनाला आमंत्रण नाकारता येत नाही. म्हणून कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करण्यात यावे, स्थानिक महिला बचत गटांना कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून घरेलू उद्योगाकरिता प्राधान्य द्यावे यांचा समावेश आहे.

या सर्व मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात यावा आणि न्याय द्यावा यासाठी भूमिपुत्रांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. भूमिपुत्रांच्या वरील मागण्यांवर योग्य ती साकारात्मक चर्चा न झाल्यास दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात येईल यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापातील चोखारे, आयोजक माजी सदस्य ग्रामपंचायत घुघुस  पवन अगदारी, सुधाकर बांदुरकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत घुघुस, हेमंत उरकुडे, शेखर तंगडपल्ली, प्रेमानंद जोगी, लखन हिकरे, तोफिक शेख, सुरज बहुराशी, सिनू गुडुला यांनी    केले आहे.

धडक मोर्च्याला विविध पक्षाचा पाठिंबा
भूमिपुत्रांच्यावतीने आयोजित  लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीवर धडक मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष दिलीप पपिट्टलवार, शिवसेनेचे शहर प्रमुख बंटी (चेतन) जयराज घोरपडे,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाचे  घुघुस शहर अध्यक्ष शरद राजेश कुमार यांनी पात्र  देऊन पाठिंबा दिला आहे .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये