ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महेश देवकते यांची पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

नवीन प्रा. आ. केंद्राची इमारत बांधण्यासाठी वन विभागांकडून जागा उपलब्ध होणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही अत्यंत खराब होऊन मोडकळीस आलेली होती, त्या इमारतीत रुग्णाला सेवा देण्यासाठी तिथे चांगली जागा राहिली नाही. इमारत मोडकळीस आलेली आहे पावसाळ्यात इमारत गळत असते, त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा रूग्णाची तपासणी करता येत नव्हती. अशा परिस्थिती मध्ये रूग्णाची सेवा करणे फार कठीण होते.

त्याचा विचार करून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही निर्लेखन करण्यात आली होती. ती निर्लेखन झाल्यामुळे इथे नवीन इमारत होणे गरजेचे होते. याची दखल घेत जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश बळीराम देवकते यांनी सतत सुधीर मुनगंटीवार मंत्री वने ,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या कडून सुधीर मुनगंटीवार यांनी पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजुर करून घेतला, त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी महेश देवकते यांना सूचना केली. इमारत आपण मंजूर केली; पण इमारत चांगल्या जागी आणि सुसज्ज झाली पाहिजे. त्यासाठी जागा कमी पडत असेल; तर जागा कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा.

त्यामुळे पाहणी केली असता पाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे असलेली वन विभागाची जागा प्राथमिक आरोग्य केंद्रा साठी मागणी करायचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश देवकते, डॉ. शेडमाके, बांधकाम विभागचे अभियंता राठोड, पाटण येथील सरपंच सीताराम मडावी, माजी उपसरपंच भीमराव पवार, पंचायत समितीच्या माजी सभापती अंजना भिमराव पवार, सामाजिक कार्येकर्ते विठल ता. चव्हाण, युवा कार्यकर्ते विश्वनाथ देवकते आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये