ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

३६५ दिवस चालणाऱ्या पालडोहच्या ५० मुलांनी अनुभवले रमण सायन्स केंद्रातील सौरमंडल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह विविध उपक्रमासाठी नेहमी ओळखल्या जाते. सण २०२३-२४ मध्ये या शाळेची शैक्षणिक सहल ही रामटेक-नागपूर या परिसरात नुकतीच जाऊन आली आहे. या सहलीमध्ये शाळेतील ५० मुलांनी सहभाग घेतला. सहलीमध्ये मुलांनी सर्व प्रथम रामटेक मधील ऐतिहासिक राम मंदिर व खिंडसी परिसराला भेट दिली.रामटेक मंदिराला भेट देऊन मुलांना ऐतिहासिक वास्तू व त्याची निर्मिती व त्याचा इतिहास स्थानिक लोकांकडून समजून घेतला.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पालडोह ही जिवती तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षल,अवघड आदिवासी तालुक्यातील शाळा.या मुलांना अश्या ऐतिहासीक वास्तूला भेट देण्याची ही पहिलच वेळ त्यामुळे मुलांनी या परिसराला भेट देऊन माहिती व आनंद घेतला.

    त्यानंतर मुलांनी ड्रॅगन पॅलेस ला भेट दिली.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची २० फुटाची मूर्ती बघून त्या विहारात आवाज हा घुमत असल्याने मुलांनी तिथे त्या विहारात गीत गायन करण्याचा आनंद घेतला. ड्रॅगन पॅलेस हा जवळपास ५० एकर चा परिसर त्यात मुलांनी धावती भेट देत मुख्य पॅलेस मधील तथागत गौतम बुद्ध यांच दर्शन घेत परिसर पाहणी केली.

     विद्यार्थी व शिक्षक यांचं मुख्य सहलीचे स्थळ म्हणजे रमण सायन्स केंद्र हे होते,मुलांनी या रमण सायन्स केंद्रात भेट देऊन सौरमंडल हा शो बघितला.मुलांनी पृथ्वी व सूर्य याची माहिती व या सौरमंडळातील प्रमुख ग्रह सूर्य असून त्यावरच सर्व जीवसृष्टी कशी अवलंबून आहे याची माहिती जाणून घेतली त्यानंतर त्यांनी त्या रमण सायन्स केंद्रामधील विविध थ्री डी शो व सायन्स वर आधारित ठेवलेली सायन्स प्रोजेक्ट ची पाहणी केली व त्याला समजून घेण्याचा प्रयत्न मुलांनी केला. मुलांनी त्या परिसरात असलेल्या डायनासोर्स च्या विविध प्रतिकृती बघितल्या. डायनासोर्स च्या विविध छटा त्यात काही मांसाहारी व काही शाकाहारी याची माहिती मुलांना समजून घेतली.मुलांनी एकप्रकारे या रमण सायन्स केंद्रात विज्ञानाला समजून घेतले.

      परतीला लागताना मुलांनी महाराजबाग ला भेट देऊन पहिल्यांदाच काही मुलांनी पट्टेदार वाघाचे दर्शन घेतले. रंगीबेरंगी पाखरे ,चिता,हरीण,पानमांजर अश्या पशु-पक्षी याना जवळून बघण्याचा आनंद घेतला. झुल्यावर मस्ती करून मुलांनी थेट बर्डीचे मेट्रो स्टेशन गाठले. हा मेट्रो प्रवास मुलांच्या सोबत शिक्षकांसाठी सुद्धा पर्वणीच होता. पहिल्यांदा मेट्रोची सफर मुलांनी केली.यावेळी तेथील सर्व स्टॉप ने तिकीट पासून ते प्रवास करण्यापर्यंत खूप सहकार्य केले.बर्डी ते विमानतळ हा मेट्रो प्रवास करत असताना तिथे उपस्थित सर्व कर्मचारी-अधिकारी यांनी सहकार्य केले.मेट्रो चा प्रवास हा मुलांकरिता एक शिक्षणच ठरले.कारण ट्रेन आणि मेट्रो या प्रवासात खूप फरक मुलांना प्रत्यक्ष अनुभवला. मुले विमानतळ या स्टेशन वर उतरून त्यांनी सरळ विमानतळ गाठले.मुलांनी विमानतळ पाहिले तिथल्या सुविधा कशा पद्धतीने असतात याची प्रत्यक्ष पाहणी मुलांनी केली.

    अश्या पद्धतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,पालडोह चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील असून जी ३६५ दिवस चालणारी शाळा आहे. या मुलांनी पहिल्यांदा मनसोक्त आनंद घेत शैक्षणिक सहल पार पाडली. या सहलीचे सर्व आयोजन व नियोजन शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी, पानघाटे,रत्नमाळ,वेलादी व शेख यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये