ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषि महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

          डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला सलंग्न समर्थ कृषि महविद्यालय देऊळगांव राजा येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत समर्थ कृषि महाविद्यालयाचे अध्यक्ष देवानंद कायंदे यांच्या उपस्थितित प्रगतशील शेतकरी रामदास म्हस्के यांनी ध्वजारोहण केले, या प्रसंगी जि प सदस्य मनोज कायंदे, वर्षाताई कायंदे, अर्जुनराव डोईफोडे, सदस्य गणेश डोईफोडे, प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे, डॉ प्रफुल्ल ताठे, सचिन घुगे, गबाजी कुटे, संपतराव खार्डे, यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

          या प्रसंगी प्रजासत्ताक दिनाचे औचित्त साधुन महाविद्यलयाच्या सचिव नंदाताई कायंदे यांनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यामागिल पार्श्वभूमी विशद करत कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नविन संशोधन करून शेतक-यांच्या उपयोगी येणारे व कमी खर्चात सहज उपलब्ध होतील असे तंत्रज्ञान विकसीत करावे व आपल्या आई-वडिलांसोबतच परिसराचे नाव उंचवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे यांनी प्रास्ताविकेत महाविद्यालयाचा उत्कर्ष व कृषिदुतांमार्फत परीसरातील शेतक-यांना होत असलेला कृषिज्ञानाचा प्रसार याबद्दल सांगितले. तसेच जास्तीत जास्त कृषी ज्ञानाचा प्रसार कृषिदुतांनी करावा जेणेकरुन अल्पभुधारक शेतकरीदेखील सधन शेतकरी म्हणुन ओळखल्या जाईल.

सोबतच या कृषिज्ञानामुळे शेतक-यांना आर्थिक फायदा मिळेल असे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार प्रा. मोहजीतसिंह राजपूत यांनी मानले. या कार्यक्रमास सागर देशपांडे, राजेंद्र म्हस्के, डिगाम्बर म्हस्के तसेच समर्थ कृषि महाविद्यालय, समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये