ताज्या घडामोडी

मुलाने केला काठीने वार बाप झाला जागीच ठार

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडला थरार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

सुधाकर श्रीरामे, नागभिड

नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वासाळा (मेंढा )येथील 53 वर्षीय इसमाचा त्याच्याच 17 वर्षीय मुलाने केलेल्या मारहाणीत  मृत्यु झाल्याची खळबळजनक घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतकाला दारूचे व्यसन होते, तो नेहमीच मद्यधुंद अवस्थेत राहत होता. घटनेच्या दिवशी मृतकाची पत्नी व आरोपीची आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. दरम्यान वडील व मुलाची वादावादी झाली व त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. मुलाने बापाच्या डोक्यावर काठीने वार केला त्यामुळे वडील जागीच कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपीने गावाच्या सरपंचांना माहिती दिली. त्यांनतर पोलीस पाटलांच्या मदतीने नागभिड पोलिसांत तक्रार करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार घारे यांनी घटनास्थळ गाठून आरोपी मुलास ताब्यात घेतले. घटनेचा पंचनामा करून पोलीस स्टेशन नागभीड येथे मर्ग दाखल केला तसेच शवविच्छेदन करून प्रेत कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. उप विभागीय पोलीस अधिकारी ठोंबरे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार घारे ह्यांच्या नेतृत्वात नागभिड पोलीस अधिक तपास करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये