अभाविप ५३ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनात प्रांत सह मंत्री पदी बाळा ऊर्फ जयेश भडगरे यांची घोषणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचे ५३वे अधिवेशन नुकतेच नागपूर येथे पार पडले. या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्य मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती आणि एका विशेष सत्राला केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची उपस्थिती होती.
या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात प्रांत मंत्री यांनी भाषणात मा. मुख्यमंत्र्यांना मागणी केली की २०१६ पासून विद्यापीठ निवडणुका बंद असलेल्या सुरू कराव्या व निवडणुका बंद असल्या मुळे युवा नेतृत्व कमी पुढे येत आहे व युवकांच्या नेतृत्वाच्या तलवारीला जंग बसला आहे. या वर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्त्तर दिलं की आम्ही सुद्धा सरकार म्हणून निवडणुका सुरू करण्याचा विचार करत आहो. या विषयावर त्यांनी हे सुध्दा बोले की “आमचे नेतृत्व हे याच विद्यार्थी जीवनात अस्थाना विद्यापीठाच्या निवडणुकांन मधून पुढे आले”.
अधिवेशनात नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. २०२४-२५ सत्रा करिता प्रांत अध्यक्ष प्राचार्य श्रीकांत परबत आणि प्रांत मंत्री कुमारी पायल किनाके. या कार्यकारिणी मध्ये प्रांत सह मंत्री म्हणून बाळा ऊर्फ जयेश प्रशांत भडगरे यांची घोषणा करण्यात आली.
हे मुळात भद्रावती चे असुन हे स्थापत्य अभियंता आहे. त्यांनी या पूर्वी भद्रावती नगर मंत्री, वरोरा भद्रावती भाग संयोजक, चंद्रपूर जिल्हा सह संयोजक, विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत अभियान समिती सदस्य, प्रांत सेवार्थ विद्यार्थी सह संयोजक म्हणून विविध जवाबदाऱ्या पार पाडल्या आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रांत सह मंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी ६ वर्षा नंतर मिळालेली आहे. या पूर्वी २०१८-१९ मध्ये अभाविप चे पूर्व कार्यकर्ते रघुवीर अहिर यांची घोषणा करण्यात आली होती.
प्रांत कार्यकारिणी मध्ये प्रांत सह मंत्री बाळा ऊर्फ जयेश भडगरे यांच्या सोबत चंद्रपूर जिल्ह्यातून प्रांत कार्य समिती सदस्य कुमारी वैदेही मुडपल्लिवार, प्रांत विकासर्थ विद्यार्थी संयोजक म्हणून आदित्य गच्केश्र्वर, प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून चंद्रपूर नगर विस्तारक सुजाण चौधरी आणि विद्या मेश्राम यांची घोषणा करण्यात आली.