गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारू वाहतूकीवर रेड कारवाई

सर्व मुद्देमाल व आरोपी पोलीसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 03.03.2024 रोजी CIU टीम ने पोस्टे देवळी हद्दीत प्रो. रेड करून एकूण 10,51,200/-रु. चा मुद्देमाल जप्त केला.घटनास्थळ – पुलगाव देवळी रोड आरोपी 1) चालक – मंगेश विजय तायवाडे वय 30 वर्षे रा. थडगे मंदिर जवळ देवळी.2) मालक – प्रमोद धात्रक रा. बेघर वस्ती देवळी.3) दारू दुकान मालक – अंकित राजू जयस्वाल रा. सावंगी टी पॉईंट वर्धा. असे अटकेत असून.,जप्त मुद्देमाल  1) 180 मिली चे प्रीमियम कंपनीचे देशी दारूने भरलेल्या एकूण 21 खाकी रंगाचे खोक्या मध्ये एकूण 1008 बॉटल किँमत 1,51,200/-₹2) एक महिंद्रा स्कॉर्पिओ कार MH 40 AC 8378 किंमत 9,00,000/-₹

     असा एकूण 10,51,200/-₹ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर माल हा मौजा विताळा जि. अमरावती येथील अंकित राजू जयस्वाल याच्या दारूचे दुकानातून आणलेला आहे

गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल पो. स्टे. देवळी चे स्टाफ चे ताब्यात देण्यात आले आहे.

     सदर कारवाई पथक पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. अभिजित गावंडे, संदिप गावंडे, केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे, पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये