ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उमेदवारांची स्थानिक मुद्दयांना बगल? चंद्रपूर लोकसभा निवडणूक आरसा दाखवणारी – महेश पानसे

चांदा ब्लास्ट

  2014 मध्ये बदलाचे वारे तर 2019 मध्ये मोदी लाट होती . यात स्वार होऊन अनेकांनी विजयाचा जल्लोष केला. अनेक राज्याच्या विधानसभा निवडणुकी मध्ये असेच निकाल आलेत. यात जे विजयी झालेत ते आता सुद्धा मोदी लाट असल्याच्या भ्रमात आहेत का? हा भ्रम पाण्यावर उठणाऱ्या बुडबुड्याप्रमाणे आहे का? हा साक्षात्कार नवनीत राणा यांना सुद्धा अमरावतीत झाल्याचे बोलले जाते.

“मोदींची हवा आहे, या फुग्यात राहू नका. 2019 साली मी अपक्ष असताना जसे काम केले, तसेच करा”. असे वक्तव्य राणा यांनी केले होते. मिडीया आणि समाजमाध्यमांनी राणांचे वक्तव्य उचलून धरलं. नंतर आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ मिडीयाने लावला असं बोलून राणा यांनी वेळ मारून नेली. मात्र पोटातलं ओठावर आलं असा हा प्रकार ठरला. राज्यातील एकंदरीत वातावरण बघता मोदी लाट ओसरली असल्याचं सध्या तरी चित्र असल्याचे बोलले जात आहे.या आओसरल्या लाटेचा थेट परिणाम चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सुद्धा बघायला मिळाल्याची चर्चा दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री रामदास आठवले ,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चित्रा वाघ यांनी चंद्रपुरात हजेरी लावली. सिने कलावंताच्या रोड शो सुद्धा झाला. सध्याची चर्चा बघता याचा फार फायदा महायुतीचे उमेदवार ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना झालेला दिसत नसल्याचेच चित्र दिसले . मोठे नेते, स्टार प्रचारकांची उपस्थिती नसतानाही महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांचे नाव चर्चेत आले आहे. स्थानिक समस्यांना बगल देऊन व ‘नमो’ चा जप जास्त असेल तर या विरोधी लाटेत तरण्याची अपेक्षा करणाऱ्या उमेदवारांना चंद्रपूरची निवडणूक आरसा दाखवणारी ठरली

असल्याचे जाणकार बोलतात.

स्थानिक मुद्दे गायब…

   चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे विशेष गाजले नाहीत. असेच चित्र इतरही मतदारसंघात दिसत आहेत. सभेला संबोधित करताना राष्ट्रीय मुद्द्यांवरच उमेदवार बोलताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर आणि मागासलेपणाची चादर ओढून बसलेल्या गडचिरोली मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांनी राष्ट्रीय मुद्द्यावरच अधिक भाष्य केल्याचे बोलले जात आहे. त्यात सरकारने दहा वर्षात काय केलं, याचाच पाडा अधिक वाचला गेला. चंद्रपूर, गडचिरोली मतदार संघातील ग्रामीण भागात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील मतदारांना राष्ट्रीय प्रश्नांशी तसही विशेष घेणं देणं नव्हतं. त्यांना गावाचा आणि स्वतःचा विकास हवा होता. यावर नेते बोलतील अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र तसं घडलं नाही. यामुळे काँग्रेस आणि भाजपा यावर

 मतदार नाराज दिसले. भाजप सत्तेत असल्याने या नाराजीचा सर्वाधिक फटका भाजप उमेदवारांना बसेल का?

हा सवाल कायम दिसला.

आता रडू नका.

 खरंतर जातीचे राजकारण लोकशाहीला मारक ठरणारे असते. उमेदवारांसाठी ते काही अंशी फायदेशीर ठरू शकते,याचा प्रत्यय चंद्रपूर लोकसभा निवडणूकीत आला. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी जातीय समीकरण प्लस ठरेल ही चर्चा आहे. त्यात सहानुभूतीची भर पडली. मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याने धानोरकर यांच्या मार्ग अधिक सुकर झाला असेही बोलले गेले. प्रचारादरम्यान झालेल्या बहुतांश सभेत धानोरकर यांनी जात आणि अश्रू यावरच अधिक जोर दिला. अधूनमधून त्या विकासावर बोलल्यात मात्र त्याची तीव्रता फारच कमी होती. धानोरकर यांना जातीय समीकरण आणि सहानुभूतीचा किती फायदा होईल हे नंतर कळेलच. एवढ्यावर त्या निवडून येतील असं चित्र रेखाटनं ही अतिशयोक्ती ठरेल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये