ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंबुजा सिमेंट कंपनीने कामगारांच्या ससमस्यांकडे लक्ष द्यावे – आ. सुभाष धोटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व विजयक्रांती कामगार संघटना कडून आयोजित अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही येथील कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकरी, शेतमजूर व कामगार मेळावा आयोजित केलेला होता. त्यासभेत आ. सुभाष धोटे यांनी कंपनी प्रशासनाला इशारा देत कामगारांच्या समस्या कडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात कंपनी कडील दत्तक गावातील बहुतांश सरपंच आम्हच्या पक्षाचे आहे त्यांचा मानसन्मान जपणे आपले काम आहे.

त्यांनी दिलेल्या गावातील समस्येचे निवारण सीएसआर फंडातून करावे अन्यथा सर्व सरपंच यांना घेऊन एल्गार पुकारावा लागेल असे ठणकावून सांगितले.

        यावेळी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे, जेष्ठ नेते विठ्ठलराव थिपे, कामगार संघटना इंटकचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, युवक काँग्रेसचे शैलेश लोखंडे, उमेश राजूरकर, विजय क्रांती कामगार संघटनेचे महासचिव बबन आत्राम, माजी जि. प. सदस्य भिमराव पुसाम,उपरवाहीच्या सरपंच गीता सिडाम, उपसरपंच अनिल कौरासे, भेंडवीचे सरपंच शामराव कोटनाके, सोनापूरचे सरपंच जंगु येडमे, लक्ष्मण बोढे, हरदोनाचे उपसरपंच एकनाथ मुटलकर, ग्रा. पं सदस्य शंकर गुरगुंडावर, पंचफुला काकडे, मनीषा मेश्राम, प्रतिभा आत्राम, ज्योती चिकराम, गोविंदा गेडाम उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून कामगार नेते विजय ठाकरे यांनी कामगारांच्या समस्येचा पाढा वाचत मागण्या मान्य करण्यासाठी आमदार महोदयांनी लक्ष द्यावे अशी विनंती केली. संचालन व आभार हरिदास मून यांनी केले. यावेळी शेकडो कामगार, शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये