एस.टी. महामंडळाच्या कर्मचा-यांचा पगार गणेशोत्सवापुर्वी होणार
दिलासा : एकुण १३२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्यात येणार

चांदा ब्लास्ट
श्री. गणेश उत्सवानिमित्त एसटी कर्मचा-यांना वेतन लवकर मिळणार
एसटी विभागातील सुमारे ८३ हजार कर्मचा-यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन गणपती उत्सवापूर्वी देण्याची घोषणा मा. परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
सामान्यतः पगार महिन्याच्या ७ ते १० तारखेनंतर दिला जातोः पण यंदा उत्सवाच्या वेळेनुसार वेतन लवकर देण्याचा निर्णय झाला आहे. ज्यामुळे कर्मचा-यांना दिलासा मिळणार आहे. याबाबत २५ ऑगस्ट रोजी शासन निर्णय जारी झाला असून चंद्रपूर विभागातील अधिकारी २० प्रशासकीय २३१, यांत्रीक ३२२, वाहक २६०, चालक ५०८ अशा एकुण १३२१ अधिकारी व कर्मचा-यांचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्यात येणार आहे. प्रशासनाने वेतन देण्यासाठी आवश्यक नियोजन केले असल्याचे विभाग नियंत्रक श्रीमती स्मिता गो. सुतवणे यांनी स्पष्ट केले आहे.
ही मागणी शासनाने मान्य केली आहे. त्यामुळे लवकरच एसटीच्या सर्व कर्मचारी व अधिका-यांच्या बँक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होणार आहे.