गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाबुराव बोंडे तर सचिवपदी आशिष निमगडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा वार्षिक कार्यकाळ संपुष्टात आल्याने आज गुरुवार (दि. ९) रोजी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. शहरातील संदीप हॉटेल येथे दुपारी ३ वाजता झालेल्या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी बाबुराव बोंडे तर सचिवपदी आशिष निमगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बैठकीत संघटनात्मक बळकटी, पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारांच्या हितासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच संघाची आगामी वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांचे उपस्थित पत्रकारांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकार सुरज माडूरवार, अरुण वासलवार, बाळू निमगडे, राजू झाडे, चंद्रजीत गव्हारे, प्रमोद दुर्गे, दीपक वांढरे, प्रसेनजीत डोंगरे, चेतन मांदाडे व राजेश डोंगरे यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संघाची एकजूट कायम ठेवत पत्रकारांच्या हक्कांसाठी व व्यावसायिक हितासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच गोंडपिपरी तालुक्यातील पत्रकारांना संघटित करून विविध सामाजिक व लोकहिताच्या विषयांवर पत्रकार संघाच्या माध्यमातून अधिक प्रभावी भूमिका घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.



