शरदराव पवार महाविद्यालय येथे तीन दिवसीय रोजगार क्षमता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
येथील शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष व समाजशास्त्र विभागाच्या वतीने बी. ए.अंतिम वर्षांच्या मुलीसाठी तीन दिवसीय रोजगार क्षमता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर दिनांक 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटक व अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह हे होते तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक श्रीकांत सुंदरगिरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आयोजक तथा गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.संजय गोरे , आयोजक समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.माया मसराम, डॉ.हेमचंद दूधगवळी ,डॉ. शरद बेलोरकर इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी तज्ञ मार्गदर्शक श्रीकांत सुंदरगिरी यांनी पदवीनंतर प्राप्त रोजगारासाठी मुलाखतीची संपूर्ण माहिती तसेच विविध रोजगार संधी आणि मुलाखत साहित्य याविषयी आणि प्रत्येक विद्यार्थ्याची पदवी नंतरनोकरी संदर्भात इंटरव्यू कशी द्यायची याची घटक निहाय तयारी या विषयावर श्रीकांत सुंदरगिरी यांनी सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती शिबिरातील सहभागी मुलींना दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींचे वेगवेगळे ग्रुप करून विविध कौशल्याबाबत अवगत केले. या तीन दिवसीय प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे पदवी प्राप्त केल्यानंतर आणि हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध कंपनीमध्ये रोजगार संधी प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष डॉ. संजयकुमार सिंग यांनी शिबिराचे महत्व विशद केले. यावेळी प्रस्ताविकातून आयोजक डॉ. संजय गोरे यांनी आयोजनाची भूमिका सांगितली. या तीन दिवसीय शिबिराचे संचालन डॉ.माया मसराम यांनी केले तर आभार प्रा. उज्वला जानवे यांनी मानले.
शिबिराच्या अंतिम दिवशी तज्ञ मार्गदर्शक श्रीकांत चंदनगिरी यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



