असोला जहांगीर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे 2 हायवा ट्रक जप्त
महसूल विभागाची सातत्यपूर्ण मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
खडकपूर्णा नदीपात्र तसेच धरणातून रेतीचे अवैध उत्खनन तसेच वाहतूक आळ्या घालण्यासाठी महसूल विभागाच्या सातत्यपूर्ण कार्यवाही मध्ये अवैध रेती तस्करांचा उद्रेक झालेला पहावयास मिळत आहे त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी अवैध रेती वाहतूक उत्खनन प्रतिबंध घालण्यासाठी नायब तहसीलदार आणि त्यांचे महसूल पथक कार्यवाहीसाठी गेलेले असताना त्यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला होता तरीसुद्धा महसूल विभाग कारवाया जोमाने करीत आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे बिनानंबरचे 2 हायवा ट्रक /दहा टायर वाला,/तालुक्यातील असोला जहांगीर येथे आज दिनांक 17 मे रोजी सकाळी 10.30 वाजता उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे,व तहसीलदार सिंदखेड राजा यांनी पकडले, दोन्ही ट्रक मध्ये प्रत्येकी पाच ब्रास वाळू होती. हायवा चालक कडे कोणताही परवाना आढळून आला नाही, दोन्ही ट्रक जप्त करून पुढील दंडात्मक कारवाईसाठी पोलीस स्टेशन सिंदखेड राजा येथे ठेवण्यात आले आहे.
सदर कारवाई ग्राम महसूल अधिकारी व्ही. बी. थोरात, जी एम पवार, एस.बी.बरांडे, पी डी बुरकुल, एस ए जाधव यांनी केली.