Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोळसा खाण प्रकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना क्रेडिट घेण्यासाठी दिशाभूल करणारे आंदोलन : किशोर टोंगे

खासदारांनी सत्तेचा माज करू नये किशोर टोंगे यांची बरांज प्रकरणावर प्रतिक्रिया

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    मतदार संघात गेल्या दहा वर्षापासून धानोरकर परिवार सत्तेत असून लोकांच्या हाताला काम देण्याऐवजी आतापर्यंत त्यांची दिशाभूल करण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे युवा नेते किशोर टोंगे यांनी कर्नाटक एम्पटा प्रकरणात झालेल्या आंदोलन व अधिकाऱ्यांना मारहाणीवर भाष्य केले.

जनतेने दिलेल्या आशीर्वाद व त्यातून मिळालेल्या सत्तेचा वापर हा मतदार संघातील जनतेचे विधायक मार्गाने विकास कामे करण्यासाठी असतो मात्र त्या ऐवजी त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केल्या जातो हे आता जनतेला लक्षात आले आहे.

मतदार संघात अधिकाऱ्यांना मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न खासदार धानोरकर व त्यांच्या परिवाराकडून होत असल्याचा आरोप किशोर टोंगे यांनी केला आहे.

या प्रकरणात स्थानिकांनी उपोषण आणि आंदोलन केले होते तरी देखील स्थानिकांना न्याय देण्याचं काम केलं नाही. परंतु हा प्रश्न जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराजभैय्या अहिर यांनी प्रश्न मार्गी लावला असून लवकरच त्याचे लाभ स्थानिकांना मिळणार असल्याचे लक्षात येताच आंदोलन करून स्वतःचा फायदा करून घेण्याचं आणि क्रेडिट घेण्यासाठी केलं आहे.

निवडणूक प्रचारात लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असा प्रचार करणारेच आता लोकशाहीत आंदोलन करण्याचा हक्क असताना, प्रश्न कायदेशीररित्या मार्गी लावण्याचा पर्याय असताना हुकूमशाही करत आहे हे जनतेने ओळखले आहे.

मागील दहा वर्ष आपण या मतदार संघात खासदार आणि आमदार म्हणून सत्तेत होतो तेव्हा तुम्हाला हे प्रश्न का दिसले नाहीत? आणि आता निवडणुका बघता आंदोलन करण्याचं कारण काय? असा सवाल वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी चे नेते किशोर दादा टोंगे यांनी केला आहे.

पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे अन्यथा असे अनेक प्रकरण मतदार संघासाठी धोक्याचे ठरू शकते असे सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये