Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिव्यांग विदयार्थ्यांकरीता उन्हाळी शिबीर संपन्न

सावली पंचायत समितीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

 गट साधन केंद्र-पंचायत समिती,सावली तर्फे समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत दिव्यांग विदयार्थ्यांकरीता उन्हाळी सुटयामंध्ये उन्हाळी विशेष वर्गाचे /शिबिराचे आयोजन ०३ मे २०२४ ते १८ जुन २०२४ या कालावधी करीता जिल्हा परिषद,प्राथमिक शाळा क्रमांक०२ येथे आयोजित करण्यात आले.

 सदर शिबीराकरीता दिव्यांग विदयार्थी १८ व सामान्य विदयार्थी २२ असे एकूण ३० विदयार्थ्यी उन्हाळी शिबीरा करीता उपस्थित होते. सदर शिबिर सकाळी 8.00 ते 11.00 या वेळेत नियमित घेण्यात आले.

शिबिरामध्ये शाळापूर्व कौश्यल्य प्रवर्ग निहाय (भाषा,गणित व इंग्रजी)यावर आधारीत साहित्याच्या माध्यमातुन विविध कृती घेण्यात आले असुन सह शालेय कौश्यल्य,नृत्य,चित्रकला,विविध खेळ,आर्ट & क्राप्ट या कृती मधून मुलांना मनोरंजनात्मक अध्यापन करुन विदयार्थ्यांच्या बौध्दीक,शारिरीक,सामाजिक व शैक्षणिक क्षमता लक्षात घेऊन मार्गदर्शन घेण्यात आले. सोबतच आर्ट & क्राप्ट साहित्य प्रदर्शनी व दिव्यांग विदयार्थी सोबत सामान्य विदयार्थी यांचा समन्वय साधुन नृत्य सादर करण्यात आले.

सदर सामारोपीय कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून पंचायत समिती,सावली गटशिक्षणाधिकारी मान.मोरेश्वर बोंडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख मान.जगनाथ वाढई केंद्र जिबगाव/सावली हे होते.प्रमुख अतिथी बालाजी गेडाम,पगडपल्लीवार ताई व राजु गुंतीवार पालक हे उपस्थित होते.

प्रथमता हेलन केलर यांच्या प्रतिमेला मार्लापन अर्पन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उदघाटक प्रसंगी मान गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या मनोगत मध्ये दिव्यांग विदयार्थ्यांची गरज व आवश्यक असणा-या सुविधा,शिक्षणाच्या प्रवाहात दिव्यांग विदयार्थी कसे टिकावे,त्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण कसे देता येईल,त्यावर प्रकाश टाकून विदयार्थांना व पालकांना विस्तृत असे मार्गदर्शन केले.तसेच अध्यक्षीय मनोगतामध्ये केंद्र प्रमूख जगन्नाथ वाढई यांनी दिव्यांग विदयार्थ्यांना शिक्षणासोबत मिळणा-या सोयी सुविधा व शिष्यवृत्ती व आवश्यकतेनुसार आरोग्य सुविधा यावर मार्गदर्शन करुन पालक व विदयार्थ्यांना उदबोधन केले.प्रिया गोडघाटे समावेशीत तज्ञ

यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

समारोपीय कार्यक्रमाचे सुत्र संचानल प्रज्ञापाल बन्सोड व अमोल भोयर विशेष शिक्षक यांनी केल.कार्यक्रमाची प्रस्तावणा सुनंदा काकडे समावेशित तज्ज्ञ व आभार बंडू भेले विशेष शिक्षक यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता उपस्थित विदयार्थी,पालक यांना स्वादिष्ट नास्टा ,जेलेबी देणयात आले .तसेच उपस्थित सर्व विदयार्थ्यांना कु.बबीता चहांदे विषय साधनव्यक्ती यांचे कडुन ड्राईंग बुक व कलर बॉक्स वितरीत करण्यात आले.

सदर उन्हाळी शिबिर यशस्वी करीता सर्व केंद्र प्रमुख व गट साधन केंद्रातील सर्व विषय साधनव्यक्ती,समावेशित तज्ज्ञ,रोखपाल व विशेष शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.गटशिक्षणाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीकरीता सर्व केंद्र प्रमुख व गट साधन केंद्रातील सर्व कर्मचा-याचे धन्यवाद मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये